गुरुवार, २२ डिसेंबर, २०१६

प्रत्येक वाट तुझ्या आठवणींनी तुडवली
रोजची रात्र पूर्ण न होणाऱ्या स्वप्नांनी जागवली

हरवले ते वाट पाहण्याचे दिवस
हरवली ती खोटी खोटी स्वप्ने

ती आस संपली तू येण्याची
ती ओढ संपली तुला पाहण्याची


गुरुवार, १५ डिसेंबर, २०१६

मनानी .... शब्दांनी .... ओढीने .... कळत ..... नकळत...  जीव गुंतत जातो.  एका अनोळखी अजाण व्यक्तीत ... इतकं सोपं नाही जीव गुंतणं सुद्धा आणि गुंतलेला जीव पुन्हा सोडवणं सुद्धा खूप त्रास होतो .